Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


क्षेत्रभेट १

अहवाल                       दि.११.०८.२०१६
                 विद्यालयातील सर्व गुरुकुल प्रकल्प वर्गातील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ अंतर्गत सत्र 1 ची क्षेत्रभेट विंचुर जवळ दक्षिणेला 4 किमी अंतरावर भारतमाता आश्रम व पी.पी. एफ. एक्स्पोर्ट्स कारखाना येथे जाऊन आली.
                या क्षेत्र भेटीसाठी गुरुकुलला असणारे इ.५वी ते इ.९ वी अखेरचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यासाठी १०.८.२०१६ रोजी सकाळी ठीक ८.३० वा.विद्यालयात एकत्र जमले व ९.०० वा सर्व शिक्षक व विद्यार्थी नियोजित स्थळाकडे निघाले. रस्त्याने सर्व विद्यार्थी अतिशय शिस्तीत व पर्यावरणाचे निरीक्षण करत होते.
                साधारणपणे १०.३० वा सर्वजन नियोजित स्थळी पोहोचलो. तिथे गेल्यावर सर्वांनी प्रथम भारतमाता आश्रम व मंदिरास भेट दिली. नंतर सर्वांनी वनभोजन केले. ल्यानंतर जवळच असलेल्या श्री.दीपक पडोळ यांच्या द्राक्ष एक्सपोर्ट करणाऱ्या पी.पी. एफ. एक्स्पोर्ट्स या कारखान्याला भेट दिली.


                             श्री .दीपक पडोळ यांनी द्राक्ष खरेदीपासून ते विक्री पर्यंत ची सर्व माहिती सविस्तरपणे विद्यार्थ्यांना  सांगितली.सर्प्रथम विशिष्ट थोमसन जातीचा साधारणपणे १७ ते २० एम एम जाडीचे द्राक्ष त्यांचे कामगार परिसरातून तोडणी करून शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. नंतर द्राक्ष व्यवस्थीत पणे कारखान्यात निवडली जातात. त्यातून अनावश्यक मनी व भाग काढून टाकले जातात.या कामासाठी त्यांच्याकडे ९० टक्के महिला कर्मचारी व १० टक्के पुरुष कर्मचारी कामासाठी आहे.नंतर सदर द्राक्ष डबा बंद करून स्टोअरेजमध्ये ० अंश से . तापमानाला साठविली जातात. नंतर सदर द्राक्ष कंटेनरच्या मदतीने जहाजाद्वारे दक्षिण आफ्रिका व इतर देशात पाठविली जातात.
          त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य कापडणीस पी.टी.यांनी देखील स्थळास भेट दिली.व श्री.दीपक पडोळ यांचे शाल व श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानले.

सर्व माहिती मिळवून विद्यार्थी व शिक्षक दु.3.०० वा.विद्यालयात परत आलो.क्षेत्रभेट यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री साळुंके ए.पी. व श्री पगार एस .पी यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे  आभार मानले.

क्षेत्रभेट प्रमुख                 गुरुकुल विभागप्रमुख              पर्यवेक्षक               मुख्याध्यापक
श्री.सरोदे पी.ए.                श्री.निकम एम.एस.           श्री.साळुंके ए.पी.          श्री.कापडणीस पी.टी.

5 comments: