Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


क्षेत्रभेट २

दि. १०.२.२०१७
अहवाल
            विद्यालयातील सर्व गुरुकुल प्रकल्प वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०१६.१७ अंतर्गत सत्र २ ची क्षेत्रभेट विंचूरजवळच असलेल्या अर्णव दुध डेअरी फार्म या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
          या क्षेत्रभेटीसाठी गुरुकुलला असणारे इ. ५ वी ते ८ वी अखेरचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यासाठी सर्वजण दि. ९.२.२०१७ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. विद्यालयात एकत्र जमले व १०.४५ वा. सर्व शिक्षक व विद्यार्थी नियोजित स्थळाकडे निघाले. साधारणपणे ११.०० वा सर्वजण विंचूर- लासलगाव रोडला असलेल्या श्री.सचिनजी देशमुख यांच्या अर्णव दुध डेअरी फार्म येथे पोहोचलो. तेथे गेल्यावर सर्वांनी दुग्ध व्यवसायासंबंधी माहिती घेतली. तेथे कार्यरत असलेले श्री. योगेश व कल्पेश थोरात यांनी विद्यार्थ्यांना या डेअरी फार्म, दुध संकलन व त्याचे वितरण याबद्दलची सविस्तर माहिती दिली.









येथे गावातील व परिसरातील सर्व शेतकरी सकाळी ७.०० वाजेपासून गाईचे व म्हशीचे दुध घेऊन येतात. सर्वप्रथम आणलेल्या दुधाचा नमुना घेऊन तो stirrer machine द्वारे ढवळून घेतात व नंतर त्या दुधात असलेले fats, proteins अशा घटकांची चाचणी घेतली जाते व त्यानुसारच दुधाचा दर ठरवून आठवड्याला शेतकऱ्याला दुधाचे पैसे दिले जातात. दिवसभरात संकलित केलेले दुध २००० ली. साठवण क्षमता असलेल्या कोल्ड स्टोरेज टाकीत साठवले जाते त्यामुळे दुध खराब होत नाही. नंतर हे दुध टॅकरद्वारे बारामती या ठिकाणी पॅकेजिंगसाठी पाठविले जाते. अशी माहिती त्यांनी दिली.
          शेवटी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.सरोदे पी.ए. व श्री.नलगे पी.व्ही. यांनी श्री. योगेश व कल्पेश थोरात यांचे विद्यालयातर्फे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन व हार्दिक आभार मानले. 


याप्रसंगी प्रकल्पप्रमुख श्री.निकम एम.एस. , उपशिक्षक श्री.चांदे आर.के., श्री.शेख एम.आय., श्री.पारधी के.बी. उपशिक्षिका सौ.सरोदे आर.पी. इत्यादी उपस्थित होते. 

सर्व माहिती मिळवून विद्यार्थी व सर्व शिक्षक दु.१२.३० वा. विद्यालयात परत आलो. क्षेत्रभेट यशस्वीपणे पार  पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य व पर्यवेक्षक यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे आभार मानले.

क्षेत्रभेट प्रमुख                 गुरुकुल विभागप्रमुख              पर्यवेक्षक               मुख्याध्यापक
श्री.सरोदे पी.ए.                श्री.निकम एम.एस.           श्री.साळुंके ए.पी.          श्री.कापडणीस पी.टी.

No comments:

Post a Comment