गुरुकुल एक सहशालेय उपक्रम
तज्ञ मार्गदर्शक व्याख्यानमाला
विद्यालयात सुरु असलेल्या रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत
आज.दि.३१.०७.२०१७ रोजी दुपारी १२.३०वा.कर्मवीर सभाग्रहात इयत्ता ७ वी ते १० वी
अखेरच्या विद्यार्थ्यांसाठी श्री.नितीन बानगुडे पाटील यांचे स्पर्धा परीक्षांवर
आधारित प्रेरणादायी व्याख्यान (video स्वरूपातील) आयोजित करण्यात आले.या
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी.सर,पर्यवेक्षक श्री.पगार
एस.पी.,यांच्यासमवेत श्री.निकम एम.एस.(गुरुकुलप्रमुख) ,श्री.चांदे आर.के. ,श्री.गाडेकर
एस.पी. , श्री.म्हस्के ए.जे. , श्री.कांबळे व्ही.जे. ,श्रीम.मानकर एस.बी. , श्री.पगारे
बी.बी. , व श्री.खोंडे आर.सी. उपस्थित होते.
व्याख्याते :श्री.नितीन बानगुडे पाटील
विषय : स्पर्धा परीक्षा
अध्यक्ष :मा.मुख्याध्यापक श्री.कापडणीस पी.टी.
सदर कायर्क्रमाची प्रस्तावना श्री.चांदे आर.के. सर
यांनी केली. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत श्री.बानगुडे पाटील यांचा परिचय करून दिला.
श्री.बानगुडे पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालील
प्रमाणे :
·
आपले भविष्य आपणच घडवू शकतो.यशाची व्याख्या
ज्याने आपल्याला मिळालेला वळेचा उपयोग केला आणि जो काळावर स्वार झाला तो यशस्वी
झाला.
·
आपणच आपला पराभव करू शकतो आणि आपणच आपल्या विजयाचे
धनी आहोत.जगात आपल्या शिवाय दुसरे कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.
·
ध्येय निश्चिंत करा आपल्याला आपले ध्येय निश्चीत करता आले
पाहिजे.स्वतःला ओळखा स्वतःची क्षमता समजून घ्या. आपली आवड काय आहे, मी काय करूशकतो
यावरून आपल्या जीवनाचे धेय्य निश्चित करा .अर्जुनासारखे फक्त आपल्या धेय्यावरच
लक्ष केन्द्रीत करा.
·
आपल्या धेय्याच्यामार्गाने चालत रहा . सतत पुढे चालत
रहा मार्ग, आपोआप सापडेल .
·
एक ना धड भारभर चिंध्या करू नका एकाच धेय्यावर लक्ष
ठेवा .
·
परिस्थितीला दोष देऊ नका परिस्थिती माणसाला घडवतही
नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही .माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच
परिस्थिती बिघडवतो .
·
जागतिक फुटबालपटू पेले याने आपल्या परिस्थीतीवर
मात करून तो फुटबाल जगाचा सम्राट झाला .पराभवाची कारणे शोधू नका पराभवातून शिका
पराभवाची चर्चा करू नका चुका शोधा आणि त्या दुरुस्त करा आणि पुढे जा. जपानी माणूस
त्यामुळेच आज सर्व क्षेत्रात पुढे आहे.एडीसनने ९९ अयशस्वी प्रयोग करूनच १००
वा प्रयोग यशस्वी केला.
·
आपल्या समोर पर्याय ठेवू नका परत फिरायचा सर्व
मार्ग बंद करा. जो पर्यंत जिंकत नाही तो पर्यंत लढा नवीन वाटा शोधा स्वतः चा मार्ग
स्वतः तयार करा .इतरांपेक्षा थोड जास्त काम करा .
·
काही बाबतीत अज्ञान फार महत्वाचे असते.जैविक शास्त्राचा
तत्वानुसार फुलपाखरूला उडता येत नाही पण फुलपाखराला तो सिद्धांत माहित नाही.
·
येणारी संकट टाळता येत नाही.संकटाना सामोरे
जा.संकटातून मार्ग काढा.
·
संकटाचे संधीत रुपांतर करता आले पाहिजे.म्हणजे
संधीचे सोने होईल .
·
स्वताःवर प्रेम करा.आपण स्वतःला आवडलो पाहिजे मी
सर्वोत्तम ठरलो पाहिजे. आपल्या चुका समजून घ्या, त्या दुरुस्त करा. स्वतः मधील
क्षमता ओळखा स्वतः स्वतःला घडवा.स्वतःचा धेय्यावर प्रेम करा .
·
भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम.प्रेमम्हणजे
सर्वस्पर्शी भक्ती . संत ज्ञानेश्वर
·
स्वतःचा धेय्यासाठी धेय्यमजनू व्हा.आपल्या श्वासात
धेय्य पाहिजे.
·
वाघाचे चित्र काढण्यासाठी प्रथम स्वतः वाघ व्हा .वाघ
बनल्याशिवाय वाघ काढता येत नाही .
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कापडणीस
सर यांनी विद्यार्थ्यांना आपले धेय्य निश्चित
करण्याविषयी मार्गदर्शन केले. एक एक ध्येय ठरवून त्याची प्राप्ती कशी करावी
याविषयी माहिती सांगितली.तसेच श्री.चांदे आर.के.सरांनी आजपासून प्रत्येक
विद्यार्थ्याने कसे वागावे याविषयी मार्गदर्शन केले.गुरुकुल प्रमुख श्री.निकम
एम.एस.सर यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
श्री.खोंडे आर.सी. श्री.निकम एम एस. श्री.कापडणीस पी.टी.
विभागप्रमुख प्रकल्पप्रमुख मुख्याध्यापक
श्री.खोंडे आर.सी. श्री.निकम एम एस. श्री.कापडणीस पी.टी.
विभागप्रमुख प्रकल्पप्रमुख मुख्याध्यापक
No comments:
Post a Comment