Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


Sunday, 31 December 2017

वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

आज दिनांक ३०/१२/२०१७ रोजी  आपल्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा  संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.मुंढे साहेब  (असि.पी.एस.आय. लासलगाव पोलीस स्टेशन ) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कु.पूनम भोये (सिने अभिनेत्री नाशिक ) उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी केले. या कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पारितोषिके उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ मालपाणी यांच्या वतीने दरवर्षी दिली जातात. तसेच कार्यक्रमास देण्यात येणारा भव्य असा मंडप प्राध्यापक श्री.बोरसे ए.टी. यांनी दिला. नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत गुरुकुल प्रकल्पातील एकूण ७५ विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व मेडल पारितोषिक स्वरूपात देण्यात आली.तसेच कर्मवीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा,तसेच सातारा येथील सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग , तालुका ,जिल्हा ,विभाग,राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा मधील ८९ विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातील वैयक्तिक व सामुहिक प्रकारातील १२ पारितोषिके देण्यात आली.
विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता 10 वी ड मधील विद्यार्थिनी कु.काजल शिवाजी माळी या विद्यार्थिनीस मा.श्री.मुंढे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळेस काजल माळी या विद्यार्थिनीस मान्यवरांनी रोख रक्कम भेट दिली.
या कार्यक्रमास विंचूर ग्रामपालिका सरपंच सौ.ताराबाई क्षीरसागर, घाटे चित्रपटाचे दिग्दर्शकश्री.बाळासाहेब उगलमुगले,  कमिटी सदस्य श्री.नारायणे गुरुजी, श्री.पंढरीनाथ दरेकर व तसेच ग्रामस्थ श्री.रणजीत गुंजाळ श्री.शंकरराव दरेकर, श्री.विनायक जेऊघाले, श्री.महेश राऊत , श्री.विकास दरेकर, श्री.कैलास ढवण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के., सौ.निकम के.एम व श्रीम.नागणे बी.आर. यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.गवळी.एन.पी.यांनी आभार मानले.














































3 comments: